१५००+ ट्रेन्ड कौन्सलर
ब्रेनवे रिसर्च फाउंडेशन मानसिक आरोग्य क्षेत्रात उत्तम कौन्सलिंग सेवा देण्याकरिता प्रशिक्षित आणि कौशल्याधिष्ठीत कौन्सलर कौन्सलिंग वर्कशॉप मधून निर्माण करीत आहे.
कायदेशीर सेवा
संपूर्ण महाराष्ट्रात ब्रेनवे फाउंडेशनच्या सर्व कौन्सलरला आणि क्लायंटला कायदेशीर मदत पुरविण्याकरीता कायदेतज्ञ यांची सेवा पुरविण्याचे कार्य करीत आहे.
कौन्सलरसाठी संदर्भसेवा
सर्व कौन्सलरला कौन्सलिंग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी क्लायंट आणि कौन्सलरला पूरक वैद्यकीय सेवा, सिनियर कौन्सलरच्या समुपदेशन सेवा, आणि सायको थेरपिस्ट पुरविले जातात.
ABOUT US
ब्रेनवे रिसर्च फाउंडेशन मानसिक आरोग्य क्षेत्रात कौन्सलिंगची उत्तम सेवा देण्याकरिता प्रशिक्षित आणि उच्च दर्जाचे कौशल्य संपादन असलेले कौन्सलर निर्माण करण्याचे काम करीत आहे. सोबतच समाजामध्ये मानसिक आरोग्याची जाणीवजागृती निर्माण करण्याकरिता, कौन्सलिंग सेवा पुरविण्याकरीता नवीन कौन्सलर, समन्वयक, ट्रेनर, कोच निर्माण करीत आहे.
“मानसिक आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे” — या विचारावर आधारित, ब्रेनवे रिसर्च फाउंडेशनचे ध्येय आहे की प्रत्येक समाजघटकापर्यंत सक्षम, संवेदनशील आणि प्रशिक्षित कौन्सलर, कोच व ट्रेनरच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचे महत्त्व पोहोचवणे. आमची दृष्टी आहे की भारताला जागतिक स्तरावर मानसिकदृष्ट्या सशक्त, भावनिकदृष्ट्या संतुलित आणि आत्मविश्वासपूर्ण समाजामध्ये रूपांतरित करणे.
प्रशिक्षित, कुशल आणि प्रमाणित कौन्सलर, कोच, ट्रेनर आणि समन्वयक तयार करणे, जे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये मानसिक आरोग्यविषयक सेवा पुरवू शकतील. मानसिक आरोग्याविषयी जाणीवजागृती निर्माण करणे — शाळा, महाविद्यालये, संस्था आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचून मानसिक आरोग्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे. कौन्सलिंग सेवा सहज उपलब्ध करणे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला भावनिक आधार, मार्गदर्शन आणि सकारात्मक जीवनदृष्टी मिळू शकेल.
What experts say about us..